Advertisement

MCAची सुनील गावसकरांना प्रशिक्षक निवड समितीत सहभागी होण्याची विनंती


MCAची सुनील गावसकरांना प्रशिक्षक निवड समितीत सहभागी होण्याची विनंती
SHARES

प्रशिक्षकांची निवड करण्याचे अधिकार असलेल्या Ad-Hoc Cricket Improving समितीत गावसकरांनी सहभागी होण्याची विनंती MCA ने केल्याची माहिती समोर येत आहे. सुनिल गावसकर यांच्यासोबतच MCA समीर दिघे आणि लालचंद राजपूत या माजी मुंबईकर खेळाडूंचीही मदत घेणार आहे.

या तिन्ही माजी खेळाडूंना MCA ने विनंती केली असून, प्रशिक्षक निवडीच्या कामात ते मदत करतील अशी अपेक्षा असल्याचं समजतं. प्रशिक्षकपदासाठी ऑनलाईन मुलाखती घेऊ शकतात. तिन्ही खेळाडू हे अनुभवी आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा मुंबईला होऊ शकतो, अशी माहिती MCA च्या अधिकाऱ्यांनी एका वृत्त वहिनीला दिली आहे.

MCA च्या नवीन संविधानानुसार प्रशिक्षक निवड समितीची स्थापना सर्वसाधारण सभेत होणं अपेक्षित आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत सर्वसाधारण सभा घेणं MCA ला शक्य नाहीये. त्यामुळे मुंबई संघाच्या प्रशिक्षक निवडीचं काम ठप्प पडलं आहे. MCA च्या वरिष्ठ कार्यकारणीने सर्व सभासदांना १० जुलैपर्यंत सर्वसाधारण सभेबद्दल आपली मतं कळवायला सांगितली आहेत.

काही दिवसांपूर्वी MCA ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून क्रिकेटचा सराव कधी सुरु करता येईल याबद्दल विचारलं होतं. त्यामुळे मुंबईच्या प्रशिक्षकपद निवडीवर काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, वासिम जाफर आणि चंद्रकांत पंडीत या २ बिनीच्या शिलेदारांना प्रशिक्षकपदी नेमण्याची संधी गमावल्यानंतर, मुंबई क्रिकेट असोसिएशनला टीका सहन करावी लागली होती. मागील काही वर्षांतली मुंबईची रणजी क्रिकेट स्पर्धेतली कामगिरी फारशी चांगली नसल्यामुळं भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी MCA च्या धोरणावर नाराजी व्यक्त केली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा