Advertisement

टी-२० वर्ल्ड कपचं समालोचन आता मराठीतून

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)नं टी-२० वर्ल्डकपचं समालोचन मराठीतून व्हावं यासाठी हॉटस्टारकडं मागणी केली होती.

टी-२० वर्ल्ड कपचं समालोचन आता मराठीतून
SHARES

इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) आता टी-२० वर्ल्डकपच्या थराराला सुरूवात होणार आहे. येत्या २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामान्यापासून या वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. विशेष म्हणजे या वर्ल्डकपचं मराठीतून समालोचन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)नं टी-२० वर्ल्डकपचं समालोचन मराठीतून व्हावं यासाठी हॉटस्टारकडं मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला हॉटस्टारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून हॉटस्टारने आता सूरु होणारी वर्ल्ड कप मॅच आणि त्याचे समालोचन मराठीत करणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, टी-२० वर्ल्डकपचं समालोचन मराठीतून व्हावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी हॉटस्टारकडं मागणी केली होती.

दरम्यान, 'मराठी समालोचनचा इतका हट्ट का?' असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना 'विषय केवळ समालोचनाचा नसून त्यातून निर्माण होत असलेल्या अर्थकारणमुळं मराठी भाषेतील जाणकारांना रोजगार मिळण्यास मदत होणार असेल तर ती आम्हाला हवी आहे', असं केतन नाईक यांनी म्हटलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा