Advertisement

आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद

आयपीएलच्या (IPL) १३व्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ५ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे.

आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद
SHARES

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात झालेल्या सामन्यात रोहित शर्मानं (Rohit Sharma) आणखी एक विक्रमला गवसणी घातली. राजस्थानविरूद्ध जेव्हा रोहित मैदानावर उतरला तेव्हा तो आयपीएलच्या स्पर्धेत सर्वाधिक सामना खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रैनासोबत दुसऱ्या स्थानी पोहोचला. धोनीने पंजाबविरूद्ध रविवारी झालेल्या सामन्यात रैनाला मागे टाकलं होतं. तो धोनीचा १९५ सामना होता. धोनी या यादीत अव्वलस्थानी आहे.

रोहितच्या नावावर १९३ सामने होते. तर रैनाच्या नावावर १९४ सामने आहेत. मंगळवारी राजस्थानविरुद्ध झालेला सामना हा रोहितचा १९४वा सामना ठरला. त्यामुळे रोहित हा यादीत रैनासोबत संयुक्तपण दुसऱ्या स्थानी आहे.

आयपीएलच्या (IPL) १३व्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ५ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. ते ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. तर राजस्थानचा संघ ४ पैकी २ सामने जिंकला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ ४ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. मुंबईचा संघ सध्या दमदार लयीत आहे, पण राजस्थान रॉयल्सला पुन्हा विजयपथावर आणण्यासाठी संघातील भारतीय खेळाडूंना कामगिरी उंचावण्याची नितांत गरज आहे.

राजस्थानविरूद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकली असून मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. मुंबईच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजस्थानच्या संघात मात्र तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अनुभवी रॉबिन उथप्पा आणि जयदेव उनाडकट यांना संघाबाहेर करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा