Advertisement

किशन, डिकॉकची शतकी भागीदारी; मुंबईचा चेन्नईवर १० गडी राखून विजय

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या विरूद्धच्या सामन्यात मुंबईन १० गडी राखून चेन्नईवर विजय मिळवला आहे.

किशन, डिकॉकची शतकी भागीदारी; मुंबईचा चेन्नईवर १० गडी राखून विजय
SHARES

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या विरूद्धच्या सामन्यात मुंबईन १० गडी राखून चेन्नईवर विजय मिळवला आहे. मुंबईचे सलामीवीर इशान किशन व क्विंटन डिकॉक यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर मुंबईनं विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईन प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजी करताना मुंबईच्या जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांनी गुडघे टेकत फक्त ११४ धावा केल्या होत्या.

चेन्नई दिलेल्या ११४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या इशान किशन-क्विंटन डी कॉक जोडीने नाबाद शतकी भागीदारी करत लक्ष्य पूर्ण केलं. किशनने नाबाद ६८ तर डी कॉकने नाबाद ४६ धावा केल्या आणि मुंबईला १० गडी राखून विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता पायचीत झाला. सामन्याच्या दुसऱ्यात षटकात जसप्रीत बुमराहनं भेदक मारा करत २ चेंडूत २ बळी टिपले. अंबाती रायडू २ धावांवर तर जगदीशन शून्यावर माघारी परतला. स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा फाफ डु प्लेसिसही स्वस्तात बाद झाला. बोल्टने त्याला एका धावेवर माघारी धाडलं. अष्टपैलू रविंद्र जाडेजा गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर बाद झाला. त्यामुळे २१ धावांत चेन्नईचा निम्मा संघ माघारी तंबूत परतला.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू, मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरच्या फिरकीवर षटकार मारण्याचा मोह त्याला आवरला नाही. त्याने एक षटकार लगावला पण पुढच्या चेंडूवर तसाच फटका खेळताना धोनी झेलबाद झाला. धोनीला केवळ १६ धावा करता आल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला दीपर चहर शून्यावर बाद झाला. राहुल चहरने त्याला डी कॉककरवी स्टंपिंग केलं. नव्या दमाच्या सॅम करननं एकाकी झुंज देत संघाला शंभरी पार करून दिली. त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या.

इम्रान ताहिरनं नाबाद १३ धावा करत त्याला साथ दिली. त्यामुळे चेन्नईला २० षटकांत ९ बाद ११४ धावा करता आल्या. ट्रेंट बोल्टने ४ तर बुमराह आणि राहुल चहरने २-२ बळी टिपले. नॅथन कुल्टर-नाइलनेही एका फलंदाजाला माघारी धाडलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा