आईला सलाम

 Mumbai
आईला सलाम
आईला सलाम
See all

मुंबई - आई. आपण जगात येतो तेच आईमुळे. तीच चाला-बोलायला, लिहायलाही शिकवते. पण आपण मोठे झालो की, आईला गृहित धरू लागतो. आईनं अमूक एक करावं आणि ती ते करणारच, असा आपला हिशोब असतो. वडिलांचं नाव अनेकदा लिहिलं जातं. पण आईचं नाव लिहायची वेळ बँक अकाउंट उघडताना किंवा एखाद्या पासवर्डच्या रजिस्ट्रेशनसाठी ‘मदर्स मेडन नेम’ पुरतीच येते. आईची तरीही काही तक्रार नसतेच. पिल्लू भरारी घेताना पाहून ती आनंदीच असते. आता मुलानं वा मुलीनं आपल्याला थोडा जास्त वेळ द्यावा, असं तिला मनोमन वाटत असतं. पण ते ती हसऱ्या चेहऱ्यामागे छान लपवून ठेवते... हे सगळं आठवायचं कारण भारत-न्यूझीलंड मॅच. या मॅचमध्ये आपले खेळाडू टी शर्टवर आईचं नाव लिहून खेळले. मॅच सुरू होण्यापूर्वी कॅप्टन कूल धोनी म्हणालाही की, आईचं कार्य एखाद्या सैनिकासारखं असतं. त्याचं महत्त्व लक्षात येत नाही. म्हणूनच आम्ही आईचं नाव टी-शर्टवर लिहिलंय. मी तर म्हणेन की प्रत्येकानंच आईचं महत्त्व रोजच लक्षात ठेवायला हवं. बात में दम है... भले ‘नयी सोच’ या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठीची ही स्ट्रॅटेजी असेल. पण आईचं महत्त्व नाकारता थोडीच येईल?

Loading Comments