जयंत यादवला योगेंद्र यादवांची शाबासकी


SHARE

मुंबई - येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कसोटीत भारतानं इंग्लंडला धूळ चारली. या सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या जयंत यादवनं शतक ठोकलं होतं. भारतासाठी अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. या खेळीबद्दल स्वराज पार्टीचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी ट्विट करून जयंतचं कौतुक केलंय...

आता योगेंद्र यादव यांनी क्रिकेटपटूचं कौतुक का करावं म्हणून तुमच्या भुवया उंचावल्या असतील. पण त्याचं उत्तरही योगेंद्र यादव यांनीच दिलंय. ट्विटमध्ये ते म्हणालेत की, जयंत हा माझ्या मावसभावाचा मुलगा. घरी आम्ही त्याला बोलू म्हणतो. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाला सामन्यावर पकड घेण्यास मदत झाली. जयंतचं अभिनंदन!

संबंधित विषय
ताज्या बातम्या