Advertisement

बेन स्टोक्सची शतकी खेळी; राजस्थानचा मुंबईवर विजय


बेन स्टोक्सची शतकी खेळी; राजस्थानचा मुंबईवर विजय
SHARES

मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात बेन स्टोक्सनं केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थाननं ८ गडी राखून विजय मिळवला आहे. राजस्थानच्या विजयामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले, पण चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

नाणेफेक जिंकून मुंबईने फलंदाजीचा निर्णय घेतला असून फलंदाजी करताना इशान किशन-सूर्यकुमार यादव यांची भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाज ६० धावांच्या खेळीमुळे मुंबईच्या संघाने २० षटकांत १९५ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन जोडीने नाबाद दीडशतकी भागीदारी करत संघाला दमदार विजय मिळवून दिला.

फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाची राजस्थानविरुद्ध सामन्यात खराब सुरुवात झाली. धडाकेबाज खेळी करणारा क्विंटन डी-कॉक पहिल्याच षटकात बाद झाला. यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवनं ४० तर इशान किशननं ३७ धावा केल्या. यानंतर शेवटच्या ४ षटकांत मुंबईनं तुफान फटकेबाजी करत ७२ धावा मारल्या. हार्दिक पांड्यानं नाबाद राहत २१ चेंडूत ६० धावा केल्या. या खेळीत त्यानं तब्बल ७ षटकार ठोकले.

राजस्थान १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना जेम्स पॅटिन्सनने रॉबिन उथप्पा (१३) आणि स्टीव्ह स्मिथ (११) या दोघांना स्वस्तात माघारी धाडलं. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने यांनी मुंबईच्या गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांचेही चेंडू स्टोक्स-सॅमसन जोडीने सीमारेषेपार पाठवले.

या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. स्टोक्सने ६० चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद १०७ धावा केल्या. तर संजून सॅमसनने ३१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५४ धावा करत त्याला उत्तम साथ दिली.

संबंधित विषय
Advertisement