Advertisement

T20 World Cup : भारतीय संघात मुंबईच्या शार्दूलला स्थान

इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) बहुप्रतिक्षित टी-२० विश्वचषक २०२१ क्रिकेट स्पर्धा होणार आहे.

T20 World Cup : भारतीय संघात मुंबईच्या शार्दूलला स्थान
SHARES

इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) बहुप्रतिक्षित टी-२० विश्वचषक २०२१ क्रिकेट स्पर्धा होणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये येत्या १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार असून, सर्व क्रिकेट चाहत्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघ निवडीवर चर्चा रंगली आहे. या चर्चेचा एक भाग म्हणजे फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संघात स्थान देण्यात आलं आहे. बुधवारी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

'आयपीएल'मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या २९ वर्षीय शार्दूलनं एकूण १८ बळी घेत लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) १५ सदस्यीय अंतिम संघांमध्ये बदलासाठी १५ ऑक्टोबपर्यंत मुदत दिली होती. भारताची सलामीची लढत २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आहे.

'राष्ट्रीय निवड समितीने संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी शार्दूल ठाकूरला १५ सदस्यीय संघात स्थान दिले आहे. त्यामुळे अक्षर राखीव खेळाडू म्हणून संघासमवेत असणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हार्दिक पंड्या गोलंदाजी करू शकत नसल्यामुळे भारताला एका वेगवान गोलंदाजाची उणीव भासत होती. संघ व्यवस्थापनाला वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता होती. त्यामुळे शार्दूलला संधी चालून आली आहे.

रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त असून, तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यास अक्षरला पुन्हा संघात स्थान मिळू शकते. 

वेगवान गोलंदाजी करू करणारा अष्टपैलू खेळाडू हार्दिकने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना ‘आयपीएल’मध्ये एकही षटक न टाकल्यामुळे ‘बीसीसीआय’ने हा निर्णय घेतला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा