Advertisement

टी-२० वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहिर; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिला वर्ल्ड कप खेळणार

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यानं नेतृत्व सोडल्यानंतर टीम इंडिया आता नवा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

टी-२० वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहिर; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिला वर्ल्ड कप खेळणार
SHARES

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यानं नेतृत्व सोडल्यानंतर टीम इंडिया आता नवा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. आयसीसीनं नुकताच टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत पुन्हा पाकिस्तानचा मुकाबला होणार आहे. त्यामुळं हा सामना कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारताचा पहिला मुकाबला हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच होणार आहे. त्यामुळे मागील वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाची सव्याज परतफेड करण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे. सुपर १२मध्ये संघांची दोन गटांत विभागणी केली आहे.

ग्रुप १ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांचा, तर ग्रुप २ मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.

या ८ संघांव्यतिरिक्त ४ संघ फर्स्ट राऊंडच्या निकालातून ठरतील. सुपर १२चे सामने ब्रिस्बेन, पर्थ, एडिलेड, सिडनी व मेलबर्न येथे होणार आहेत, तर होबार्ट व गिलाँग येथे फर्स्ट राऊंडचे सामने खेळवले जातील. भारताचे सामने मेलबर्न, सिडनी, पर्थ व एडिलेड या चार मैदानावर होतील.

भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक

२३ ऑक्टोबर - विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न; दुपारी १.३० वाजल्यापासून 

२७ ऑक्टोबर - विरुद्ध ग्रुप ए चा उप विजेता, सिडनी; दुपारी १२.३० वाजल्यापासून

३० ऑक्टोबर - विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ; सायंकाळी ४.३० वाजल्यापासून 

२ नोव्हेंबर - विरुद्ध बांगलादेश, एडिलेड; दुपारी १.३० वाजल्यापासून

६ नोव्हेंबर - विरुद्ध ग्रुप बी चा विजेता, मेलबर्न;  दुपारी १.३० वाजल्यापासून

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा