'टोटल कप'मध्ये वेंगसरकर संघाला आघाडी

  Churchgate
  'टोटल कप'मध्ये वेंगसरकर संघाला आघाडी
  मुंबई  -  

  ओव्हल मैदानावर 'दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन'ने आयोजित केलेल्या 22 व्या 'टोटल कप' या 14 वर्षांखालील खेळाडूंच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या साखळी लढतीत वेंगसरकर संघाने आघाडी घेतली आहे.

  वेंगसरकर संघाने नाणेफेक जिंकून गावस्कर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि वेंगसरकर संघाच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. या सामन्यात आदित्य जाधवची डावखुरी फिरकी प्रभावी ठरली. त्याने 39 धावांत 5 बळी घेत गावस्कर संघाला 98 धावांत गुंडाळले.गावस्कर संघाच्या निसार शेख (33) आणि ऋषिकेश गोरे (14) यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली.

  पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेंगसरकर संघाने 8 बाद 165 अशी मजल मारली आहे. आकाश सिंग (31), प्रिन्स बदानी (31), ओवेस शेख (15) आणि आदित्य पवार (20) यांनी छोट्या खेळी करत संघाला आघाडी मिळवून दिली. गावस्कर संघाच्या अनुराग सिंग (24/3) आणि रितेश नलावडे (42/2) या फिरकी गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाची आघाडी मर्यादित ठेवण्यात यश मिळविले आहे. वेंगसरकर संघाला लवकर गुंडाळून ते निर्णायक विजयासाठी प्रयत्न करतील.

  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.