Advertisement

मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव; रोहित शर्माचा बॅड पॅच सुरूच!

शेवटच्या बॉलपर्यंत उत्सुकता ताणल्या गेलेल्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. सलग तिसरा सामना मुंबई इंडियन्सने गमावला असल्यामुळे आता त्यांना स्पर्धेतील त्यांचे आव्हान कायम राखण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव; रोहित शर्माचा बॅड पॅच सुरूच!
SHARES
Advertisement

शेवटच्या बॉलपर्यंत उत्सुकता ताणल्या गेलेल्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. सलग तिसरा सामना मुंबई इंडियन्सने गमावला असल्यामुळे आता त्यांना स्पर्धेतील त्यांचे आव्हान कायम राखण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात होम ग्राऊण्डवर मुंबई इंडियन्स विजयाचा श्रीगणेशा करेल अशी आशा चाहत्यांना होती. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबादसोबत झालेल्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला विजय हवाच होता. त्याच तयारीने त्यांनी मॅचची सुरुवातही केली होती.

दिल्ली डेअरडेव्हिल्सने टॉस जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी पाचारण केलं. यावेळी महत्त्वाचा निर्णय घेत कॅप्टन रोहित शर्माने स्वत: ओपनिंगला न येता एव्हिन ल्युइससोबत सूर्यकुमार यादवला ओपनिंगला पाठवलं. आणि रोहित शर्माचा हा निर्णय मुंबई इंडियन्ससाठी लॉटरीच ठरला!पहिली इनिंग

सूर्यकुमार यादवने मिळालेल्या प्रमोशनचा पुरेपूर फायदा घेत ल्युइससोबत १०९ रनांची पार्टनरशीप केली. यामध्ये सूर्यकुमारने ३२ बॉलमध्ये तडकावलेल्या ५३ रन्सचा तर ल्युईसने फक्त २८ बॉलमध्ये तडकावलेल्या ४८ रन्सचा समावेश होता. या जोडीची तुफान हाणामारी पाहून मुंबई इंडियन्सची नौका सहज २०० पार होईल, अशी आशा मुंबईच्या चाहत्यांना होती. मात्र, राहुल तेवाटियाच्या बॉलिंगवर कॅच देऊन एव्हिन ल्युइस माघारी परतल्यानंतर मुंबई इंडियन्सचा डाव अडखळायला सुरूवात झाली.रोहित शर्माने यावेळीही स्वत: न येता इशान किशनला तिसऱ्या नंबरवर बढती दिली. कॅप्टनचा निर्णय योग्य ठरवत इशान किशनने अवघ्या २३ बॉलमध्ये ४४ रन्स कुटत दिल्लीच्या बॉलिंगची पिसं काढली. पण यावेळी वाढलेला धावांचा वेग सूर्यकुमार आऊट झाल्यानंतर खाली आला. मुंबई इंडियन्सच्या इनिंगमध्ये १५व्या ओव्हरमध्ये सामन्याचा पूर्ण नूरच पालटला. डॅन ख्रिस्तियनने या ओव्हरमध्ये २ विकेट काढून मुंबई इंडियन्सच्या डावाला मोठं भगदाड पाडलं. या एकाच ओव्हरमध्ये इशान किशन आणि पोलार्ड माघारी परतल्यामुळे २०० धावांचं स्वप्न अडखळायला लागलं.

१६व्या ओव्हरनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोअर ४ विकेट्सवर १६६ होता. इथून २००चा आकडा दृष्टिपथात वाटू लागला होता. मात्र स्वत: कॅप्टन रोहित शर्मा(१८), कृणाल पंड्या(११) आणि हार्दिक पंड्या(२) स्वस्तात माघारी परतले. त्यामुळे अडकलेली मुंबई इंडियन्सची इनिंग २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्सच्या बदल्यात १९४ रन्सपर्यंतच पोहोचू शकली. दिल्लीसाठी ट्रेन्ट बोल्ट, डॅन ख्रिस्तियन आणि राहुल तेवाटिया यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर मोहम्मद शामीने १ विकेट घेतली.


दुसरी इनिंग

जिंकण्यासाठी दिल्लीसमोर १९५ रन्सचं टार्गेट होतं. दिल्लीचा कॅप्टन गौतम गंभीर स्वत: जेसन रॉयसोबत ओपनिंगला उतरला. या दोघांनी दिल्लीच्या डावाला आश्वासक सुरूवात केली. मात्र, अवघ्या १५ रन्सवर कॅप्टन गौतम गंभीर आऊट झाला. मुस्तफिझुर रेहमानने त्याची विकेट घेतली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रिशभ पंत आणि जेसन रॉयने मिळून मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सची यथेच्छ धुलाई केली.

११व्या ओव्हरमध्ये ११९ स्कोअर असताना दिल्लीला रिशभ पंतच्या रूपात दुसरा धक्का बसला. कृणाल पंड्याच्या बॉलिंगवर कायरन पोलार्डने त्याचा अप्रतिम कॅच घेतला. तोपर्यंत पंतने २५ बॉलमध्ये ४७ रन्स तडकावले होते. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने ६ बॉलमध्ये १३ रन्स केले. कृणाल पंड्याच्या बॉलिंगवर हार्दिक पंड्याने लाँग ऑफला त्याचा अप्रतिम कॅच घेतला.

दुसऱ्या बाजूला रॉय सतत मुंबईच्या बॉलर्सची डोकेदुखी ठरत होता. अवघ्या ५३ बॉलमध्ये रॉयने ६ सिक्स आणि ६ फोरच्या मदतीने ९१ रन्स कुटले. शेवटच्या ओव्हरमध्ये ११ रन्स जिंकायला शिल्लक असताना मुस्तफिझुर रेहमानकडे बॉल देण्यात आला.

मुस्तफिझुरच्या पहिल्याच बॉलवर जेसन रॉयने फोर वसूल केला. या धक्क्यातून मुस्तफिझुर सावरत नाही तोच दुसऱ्या बॉलवर रॉयने सिक्स ठोकला. यामुळे प्रचंड दबावाखाली आलेल्या मुस्तफिझुरने पुढचे तीन डॉट बॉल टाकून सगळं दडपण बॅट्समनवर टाकलं. शेवटच्या बॉलवर एक रन हवा असताना जेसन रॉयने लाँग ऑफला बॉल हवेत उडवत एक रन घेतला.

सलग तिसऱ्या पराभवामुळे आता मुंबई इंडियन्सच्या टीमवर आणि पर्यायाने कॅप्टन रोहित शर्मावर दबाव वाढलेला असताना त्याचा स्वत:चा फॉर्मही वाईट सुरू आहे. त्यामुळे येत्या १७ एप्रिलला रॉयल चॅलेन्जर्स बँगलोरसोबत होणाऱ्या चौथ्या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मालाही प्रचंड मेहनत घ्यावी लागेल यात शंका नाही!

संबंधित विषय
Advertisement