Advertisement

यंदाचा मोसम स्थगित झाल्यानंतरची गांगुलीची पहिली प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाला...


यंदाचा मोसम स्थगित झाल्यानंतरची गांगुलीची पहिली प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाला...
SHARES

कोरोनानं बायो-बबलमध्ये शिरकाव केल्यामुळं इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे २ खेळाडू, तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या काही सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर मंगळवारी आणखी २ खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं बीसीसीआय आणि गव्हर्निंग कौन्सिलला यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करणं भाग पडले. या स्थगितीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव कसा झाला हे आम्हाला ठाऊक नाही. आम्हाला मिळालेल्या रिपोर्टनुसार, बबलच्या नियमांचे कोणीही उल्लंघन केले नाही. आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. इतक्या लोकांना कोरोनाचा संसर्ग कसा होत आहे, हे सांगणे जसे अवघड आहे, तसेच बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव कसा झाला हे सांगणे कठीण आहे, असे गांगुली यानं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

आयपीएल स्पर्धा स्थगित झाली असून, रद्द झालेली नाही, असे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले होते. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकात यंदा आयपीएल पुन्हा आयोजित करण्यासाठी वेळ मिळेल हे सांगणे अवघड असल्याचे गांगुली म्हणाला. तसेच मागील वर्षीप्रमाणेच यंदाही आयपीएलचा मोसम युएईमध्ये घेण्याबाबत बीसीसीआयने विचार केला होता. मात्र, फेब्रुवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्या कारणाने आम्ही यंदा आयपीएल भारतात घेण्याचे ठरवले होते, असे गांगुलीने सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा