Advertisement

World Test Championship Final : न्यूझीलंडसमोर १३९ धावांचं लक्ष्य

विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे प्रमुख फलंदाज झटपट माघारी परतले. ऋषभ पंतने ८८ चेंडूत ४१ धावांची झुंजार खेळी केली.

World Test Championship Final : न्यूझीलंडसमोर १३९ धावांचं लक्ष्य
SHARES

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (world test championship final) अंतिम सामन्यात विजयासाठी न्यूझीलंडला (new zealand) आता ५३ षटकात १३९ धावांची आवश्यकता आहे. सहाव्या व निर्णायक दिवशी भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या. साऊदी, बोल्टने केलेल्या दमदार गोलंदाजीमुळे भारताचा दुसरा डाव ७३ षटकात १७० धावांवर आटोपला. 

 विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे प्रमुख फलंदाज झटपट माघारी परतले. ऋषभ पंतने ८८ चेंडूत ४१ धावांची झुंजार खेळी केली. पाचव्या दिवसअखेर २ बाद ६४ धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारताने उपाहारापर्यंत विराट कोहली (१३), चेतेश्वर पुजारा (१५) आणि अजिंक्य रहाणेला (१५) गमावले.  रिषभ पंतने चांगला खेळ करताना आशा पल्लवीत केल्या. पण, रवींद्र जडेजा व आर अश्विन या दोन अष्टपैलू खेळाडूंना त्याला साथ देता आली नाही.

उपाहारापर्यंत भारताने ५५ षटकात ५ बाद १३० धावा केल्या. ७० व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात ऋषभ पंत ४१ धावांवर झेलबाद झाला. त्याच षटकात बोल्टनं टीम इंडियाला आणखी एक धक्का देताना आर अश्विनला माघरी पाठवलं. मोहम्मद शमीनं झटपट १३ धावा करून वेग वाढवला, परंतु टीम साऊदीनं त्याला बाद केलं. भारताचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. 

न्यूझीलंडसमोर आता १३९ धावांचं माफक लक्ष्य आहे. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टिम साऊदीने ४८ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. बोल्टने ३, जेमीसनने २ तर नील वॅगनरने १ बळी घेतला. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा