308 किलो अंमली पदार्थासह 10 जणांना अटक


308 किलो अंमली पदार्थासह 10 जणांना अटक
SHARES

पडीक फॅक्टरीत अंमली पदार्थ (केटामाईन ड्रग्ज) बनवून त्याचा व्यवसाय करणाऱ्या टोळीचा महसूल गुप्तवार्ता विभाग (डिआरआय)च्या अधिकाऱ्यांनी 'पर्दाफाश' केला आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या टोळीच्या रायगड, गोवा, आणि गुजरातच्या वडोदरा येथील अंमली पदार्थ बनवणाऱ्या फॅक्टरीवर छापे टाकून तब्बल 308 किलोचे केटामाईन ड्रग्ज हस्तगत केले असून दहा जणांना आतापर्यंत अटक केली आहे.


डीआरआयने केली कारवाई

एकीकडे शहरात अंमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलिसांचा प्रयत्न सुरू असताना तस्करांनी आता मुंबईबाहेरून शहरात अंमली पदार्थांची तस्करी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत केटामाईन या ड्रग्जची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या टोळीची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.


काय आहे 'ऑपरेशन व्हिटॅमिन'?

मुंबईत तीन वेगवेगळ्या राज्यातून हे अंमली पदार्थ शहरात आणले जात होते. मात्र या टोळीचा पर्दाफाश करणे तितकेसे सोपे नव्हते. यासाठी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी चार ते पाच विशेष पथके बनवली होती. या संपूर्ण कारवाईला त्यांनी 'ऑपरेशन व्हिटॅमिन' असं नाव दिलं होतं. त्यानुसार डीआरआयने गोवा, रायगड आणि वडोदरा येथील अंमली पदार्थांची निर्मिती करणाऱ्या फॅक्टरीवर कारवाई केली. त्यावेळी पोलिसांनी विविध कारवाईत एकूण दहा जणांना अटक केली. 

IMG-20180613-WA0015.jpg

अमली पदार्थांचा साठा जप्त

घटनास्थळाहून 308 किलो केटामाईन अमली पदार्थांचा साठा जप्त केला. याचसोबत 2000 किलोचे रॉ मटेरियल हस्तगत केले आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या दहा जणांपैका तीन जण हे परदेशी नगरिक आहेत. या सर्वांवर 1985 एनडीपीएस अॅक्टनुसर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.


केटामाईनचा कोडमध्ये उच्चार

ही टोळी या केटामाईनला विविध कोडमध्ये उच्चार करायचे. उदा. (Call 'k', spcial 'k', vitamin 'k') या पद्धतीने केटामाईन हा अंमली पदार्थ रेव्ह पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. अत्यंत महागडे असलेले हे केटामाईन मेट्रो सीटीमध्ये होणाऱ्या हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये वापरला जातो हे जग जाहीर असलं, तरी ज्या माणसांमार्फत केटामाईनच्या पावडरची वाहतूक केली जात होती त्या माणासांना हे पावडर आईसक्रीम बनवण्यात येण्यासाठी लागणारे पावडर असल्याचं सांगितले जात होतं. हे पावडर कंपनीत तयार करून इतरत्र ठिकाणी पाठवतो, असंही सांगितलं जात होतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा