५३ कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त

पूर्वदूतीगती महामार्गावरील भांडुप पम्पिंग स्टेशन जवळ असलेल्या बस क्र 368 आणि 373 बसस्टोप येथे पथकाने सापळा लावला होता. त्यानुसार तस्कर भांडुप येथे ट्रक घेऊन आले असताना. पोलिसांनी संशयित ट्रक थांबवून झडती घेतली असता. त्यात 9 किलो एमडी पावडर आढळली.

५३ कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त
SHARES

मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाने पनवेल येथील केमिकल कारखान्यातून आणलेले एमडी (अंमली पदार्थ) भांडूप येथून जप्त केलं आहे. जप्त केलेल्या एमडी ड्रग्जची किंमत ५३ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी एटीएसने रज्जाक उर्फ अरिफ, जितेंद्र परमार, नरेश म्हसकर, सुलेमान आणि एका संशयिताला अटक केली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी दिली.

अशी केली कारवाई

मुंबईच्या विक्रोळी एटीएस कक्षाला दोन अनोळखी व्यक्ती मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एटीएसचे अधिकारी पूर्वद्रुतगती महामार्गावरील भांडूप पम्पिंग स्टेशनजवळ असलेल्या बस क्र. ३६८ आणि ३७३ च्या बसस्टॅपजवळ पथकाने सापळा लावला होता. तस्कर भांडूप येथे ट्रक घेऊन आले असताना पोलिसांनी  ट्रक थांबवून झडती घेतली असता त्यात ९ किलो एमडी पावडर आढळली. पोलिसांनी त्या ठिकाणी ट्रक चालक आरोपी रज्जाक उर्फ अरिफ आणि सुलेमान यांना अटक केली. या दोघांच्या  चौकशीतून हे ड्रग्ज पनवेल येथील कारखान्यातून आणण्यात आलं असल्याचे समोर आलं.  त्यानुसार पोलिसांनी पनवेल येथील कारखान्यातून उर्वरित १२० किलो एमडी जप्त करत जितेंद्र परमार, नरेश म्हसकर आणि अन्य एकाला अटक केली. 

१२९ किलो एमडी हस्तगत

हे त्रिकुट प्रतिबंधीत असलेली एमडी पावडर राज्यभरात वितरीत करीत होते. दहशतवादी पथकाने आतापर्यंत अंमली पदार्थ तस्करांकडून तब्बल १२९ किलो एमडी पावडर हस्तगत केली आहे. या एमडी पावडरची प्रति किलो ४० लाख रुपये किंमत आहे. अटक आरोपी हे नवीन पनवेलमधील कारखान्यात उच्च दर्जाचे रसायन पुरवून मोठ्या प्रमाणात एमडीची निर्मिती करीत होते. 

न्यायालयीन कोठडी

मुंबई ठाणे आणि नवी मुंबईसह अनेक शहरात एमडी पावडर पुरविण्याचे मोठे नेटवर्क असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या अटक आरोपींच्या तपासात आणखी खुलासे होण्याची शक्‍यता आहे. आरोपी जितेंद्र परमार, नरेश म्हसकर आणि रज्जाक याना न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर पोलीस पथक आरोपी सुलेमान आणि अन्य एका आरोपीला बुधवारी न्यायालयात हजार करणार असल्याची माहिती पथकाने दिली.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा