१३ वर्षांच्या मुलीने का केली आत्महत्या?


१३ वर्षांच्या मुलीने का केली आत्महत्या?
SHARES

पवईत ८ वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. शाळेत कॉपी करताना पकडल्याने नैराश्येतून तिनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.

ही मुलगी कुर्ल्याच्या मिशेल हायस्कूलमध्ये ८ वी इयत्तेत शिकत होती. परीक्षेचा अभ्यास पूर्ण न झाल्यामुळे तिने पेपर सुरु असताना कॉपी केली. शिक्षकांनी तिला कॉपी करताना पकडलं आणि सर्वांसमोर ओरडले. या प्रकाराने आता आपल्याला वर्गातील सगळेजण चिडवतील या भीतीने सोमवारी दुपारी घरी आल्यावर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. 

मुलीला तातडीने स्पिरिट हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा