आॅनलाईन जुगार अड्यावर कारवाई


आॅनलाईन जुगार अड्यावर कारवाई
SHARES

घाटकोपरमध्ये आँनलाईन सुरू असलेल्या पोकर जुगारावर मुंबईच्या प्राँपर्टी सेलच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी तब्बल १४ जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी १ लाख ३९ हजार रुपये या ठिकाणाहून जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच बरोबर ४ हजार १९८ प्लास्टिक काँईन, चिप्स,पोकर टेबल,१४ फोन,६ बंडल पत्ते असा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

मुंबईच्या घाटकोपर येथील के.के आँटोमोबाइल कार सर्व्हिस स्टेशन, गंगावाडी रहिवाशी मंडळ परिसरात काही जण आँनलाईन जुगार खेळत असल्याची माहिती मुंबईच्या प्राँपर्टी सेलच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता. काही जण आँनलाईन जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी जुगार खेळत असलेल्या १४ जणांना ताब्यात घेत, त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. या सर्वांना न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा