नियमांचे उल्लघंन, अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या 178 जणांवर गुन्हे दाखल

कायदा पायदळी तुडवत व्यवसाय करणाऱ्या 178 जणांवर पोलिसांनी आतापर्यंत गुन्हे दाखल

नियमांचे उल्लघंन, अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या 178 जणांवर गुन्हे दाखल
SHARES

देशासह महाराष्ट्रात सध्यो कोरोना या संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. पाहता पाहता महाराष्ट्रात कोरोनाचे 122 रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमिवर मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचार बंदी लागू करत अत्यावश सेवा देणारा दुकाने वगळता शाळा, हाँटॆल, बार, पान बिडी शाँप आणि इतरंना व्यवसाय करण्यावर बंदी घातलेली आहे. माञ तरी ही कायदा पायदळी तुडवत व्यवसाय करणाऱ्या 178 जणांवर पोलिसांनी आतापर्यंत गुन्हे दाखल केले आहेत.

कोरोना हा संसर्ग रोग असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी त्याचा प्राधुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सीमा बंद करून संचार बंदीचे आदेश दिले. तसेच शाळा महाविद्यालय, खासगी कंपन्या बंद किंवा 'वर्क फाँर्म होम'चे आदेश दिले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देऊन सुद्धा काही ठिकाणी दुकानॆ उघडी अथवा छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी असे नियम पायदळी तुडवणाऱ्या दुकानदारांविरोधात धडक कारवाई सुरू केली.


मुंबई आणि उपनगरांसह पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 178 जणांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यात होम क्वारंनटाइनकरून बिनदिक्कत फिरणाऱ्या 5 जणांचा समावेश आहे. त्याच बरोबर 21 हाँटेल, 12 पान टपरी,74 दुकाने, 28 फेरीवाले, 10 सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करणारे, 28 अवैध वाहतूक असे एकूण 178 जणांचा समावेश आहे. या सर्वांवर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कायदा 1860 कलम 188 नुसार कारवाई करण्यात आला आहे.


कोणती दुकाने उघडी ठेऊ शकतात

1) बँक, एटीएम, विमा संबधित कंपन्या

2) प्रसार माध्यम व त्यांचे प्रतिनिधी

3)माहिती तंञद्यान, इंटरनेट व डाटा सर्व्हिसिंग, दूर संचार व टपाल सेवा

4) अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व वाहतूक करणारे

5)शेती व इतर सर्व वस्तूंची आयात व निर्यात करणारे

6) अत्यावशक वस्तू, अन्न, औषध, वैद्यकिय गोष्टीच् वितकण करणारे

7)अन्न-धान्य बेकरी, किराणा माल, दूध, अंडी,पाव, फळे, पालेभाज्या यांची दुकाने व वितरण करणारे

8)पाळीव प्राण्यांचीअत्यावशक दुकाने

9)घरपोच जेवण पुरवणारे

10) रुग्णालय, मेडिकल स्टोअर्स, दवाखाने, औषध निर्मितीव पहचवणारे

11)पेट्रोल पंप, डिझेल, तेलाची विक्री करणारे

12) अत्यावशक सेवा पुरवठा करणाऱ्या सर्व आस्थापनांना पुरवठा करणाऱ्या खासगी संस्था

13)कोविड 19 वर अत्यावश्यक सेवा करणारे खासगी संस्था
Read this story in हिंदी
संबंधित विषय