भरधाव जॅग्वार कारच्या धडकेत दोघे जखमी


भरधाव जॅग्वार कारच्या धडकेत दोघे जखमी
SHARES

अंधेरीतल्या वर्सोवा येथे भरधाव वेगात असलेल्या जॅग्वार कारने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 10 ते 12 गाड्यांना धडक दिली. या अपघातात दोघे जण जखमी झाले. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपी चालकाचं नाव हितेश गोलचा असून स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं.


संपूर्ण प्रकार

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मद्यधुंदावस्थेत असलेल्या जग्वार कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने पार्किंगमध्ये असलेल्या 10 ते 12 गाड्यांना धडक दिली. या घटनेनंतर आरोपी चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र जमावाने त्याचा पाठलाग केला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं. 

या अपघातात रितेश रवींद्र पाटील (21) आणि अमितकुमार प्रजापती (24) हे दोघेही जखमी झाले. या दोघांना अंधेरीच्या कोकिलबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


कार जप्त

हा अपघात वर्सोवातील एसव्हीपी नगरमध्ये सोमवारी संध्याकाळी 8.30 ते 9 वाजेच्या दरम्यान झाला. दरम्यान तेथील जमावानं आरोपीचा पाठलाग करत त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. शिवाय त्या जॅग्वार कारचीही तोडफोड केली. सध्या पोलिसांनी कार चौकशीसाठी जप्त केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा