वांद्र्याच्या हॉटेलमध्ये झालं लाईव्ह सुसाईड

  मुंबई  -  

  वांद्रे - चित्रपटात आपण बिल्डिंगवरून उडी मारल्याचे स्टंट पाहिले असाल. मात्र वांद्र्यामध्ये एका तरुणाने हॉटेलच्या १९व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

  वांद्र्याच्या ताज लँड्स अॅन्ड हॉटेलमधून एका तरुणाने उडी मारल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे खाली जमलेल्या लोकांनी व्हिडियो मध्ये 'लाइव्ह सुसाईड'ची ही चित्तथरारक दृश्य रेकॉर्ड केली आहेत. 19 मजल्यावर असलेल्या खोलीत हा तरूण असताना त्याने खोलीची काच आतून फोडण्याचा प्रयत्न केला. तीन ते चार वेळा प्रयत्न केल्यानंतर ही काच फोडण्यात तो यशस्वी ठरतो. जशी काच पूर्णपणे निखळून बाहेर पडते, तसा बाथ सूटमध्ये असलेला एक तरुण बाहेर खिडकीवर चढतो आणि क्षणार्धात खाली उडी घेतो. अर्जुन भारद्वाज (24) असं या तरुणाचं नाव असून, तो हॉटेलमध्ये गेस्ट म्हणून थांबला होता अशी माहिती मिळतेय. हा तरुण डिप्रेशनमध्ये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.