मुंबईत आचारसंहिता भंगच्या 33 तक्रारी

जिल्हाधिकारी कार्यालयात सी-व्हिजिलचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, आतापर्यंत 1 हजार 192 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील मुंबईत 33 तक्रारींची नोंद आहे.

मुंबईत आचारसंहिता भंगच्या 33 तक्रारी
SHARES

आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचा भंग झाल्यास नागरिकांना ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपच्या माध्यमातून थेट तक्रार करतात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये तक्रारीची दखल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सी-व्हिजिलचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, आतापर्यंत 1 हजार 192 तक्रारी प्राप्त झाल्याची आहेत. त्यातील मुंबईत 33 तक्रारींची नोंद आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाने आचार संहितांचे उल्लघंन करणाऱ्या विरोधात सी-व्हिजिल मोबाइल अँप तयार केले आहे. या अँपच्या माध्यमातून नागरिकांना आचारसंहिता भंगचा प्रकार निदर्शनास आल्यास थेट मोबाइलवर छायाचित्र काढून किंवा दोन मिनिटांची चित्रफीत तयार करून तक्रार दाखल करता येणार आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर वीस मिनिटांत तक्रारीची दखल घेऊ न कारवाई होणार असून तक्रारदाराची माहिती गोपनीय राहणार आहे. तक्रारदाराला तक्रारीवर काय कार्यवाही केली याची माहिती मिळणार आहे. अशा प्रकारे या अँपवर संपूर्ण महाराष्ट्रातून 1 हजार 192 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. 

या तक्रारीत मुंबई शहर 33, अहमदनगर 39, अकोला 6, अमरावती 70, औरंगाबाद 15, बीड 6, भंडारा 7, बुलडाणा 18, चंद्रपूर 3, धुळे 7, गडचिरोली 2, गोंदिया 29, हिंगोली 8, जळगाव 23, सोलापूर 165, परभणी 14, रायगड 20, रत्नागिरी 10, सांगली 16, सातारा 17, वर्धा 11, यवतमाळ 18, ठाणे 140, पुणे 138, मुंबई उपनगर 45, जालना 6, कोल्हापूर 16, लातूर 11, नागपूर 40, नांदेड 26, नंदूरबार 3, नाशिक 7, उस्मानाबाद 11, पालघर 24 तक्रारींची नोंद झाली आहे. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातून सर्वाधिक 188 तर सर्वात कमी सिंधुदुर्ग 1 तक्रार दाखल झाली आहे. माञ दाखल तक्रारींमधील वस्तूस्थिती पडताळली असता. या तक्रारींपैकी फक्त 692 तक्रारी योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. या तक्रारींमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे, मतदारांना भेट वस्तू देणे, पैसे वाटप करणे, विना परवाना पोस्टर, विन परवाना वाहन या तक्रारींचा समावेश आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा