टेम्पोरिक्षा अपघातात विद्यार्थी जखमी

 Kurla
टेम्पोरिक्षा अपघातात विद्यार्थी जखमी
टेम्पोरिक्षा अपघातात विद्यार्थी जखमी
टेम्पोरिक्षा अपघातात विद्यार्थी जखमी
टेम्पोरिक्षा अपघातात विद्यार्थी जखमी
See all

लोकमान्य टिळक टर्मिनल्स - चेंबूर सांताक्रुझ लिंक रोड वरील लोकमान्य टीळक टर्मिनसच्या जवळ टेम्पो आणि मोटरसायकल मध्ये सोमवारी दुपारी 3.45 च्या सुमारास अपघात झालाय. या अपघातात टेम्पोचालकासह शाळेचे 4 विद्यार्थी आणि शाळेचा सुरक्षारक्षक जखमी झालाय. जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. विवेकानंद स्कुलमध्ये विज्ञान प्रदर्शनात कुर्ला परिसरातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. हा कार्यक्रम संपल्यावर विद्यार्थी शाळेत रिक्षा टेम्पोमधून जात होते. मात्र टेम्पो एससीएलआर ब्रीज वर येताच एक मोटारसायकलस्वार टेम्पोच्या समोर आला. त्यामुळे रिक्षा टेम्पो चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो उलटा झाला. यामध्ये विद्यार्थी जखमी झालेत.

Loading Comments