चितळे खंडणी प्रकरणाचे मुंबई कनेक्शन, धमकी देणाऱ्या शिक्षिकेसह पाच जणांना अटक

पुण्यातील प्रसिद्ध चितळू बंधूंना ब्लॅमकेल करत २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

चितळे खंडणी प्रकरणाचे मुंबई कनेक्शन, धमकी देणाऱ्या शिक्षिकेसह पाच जणांना अटक
SHARES

पुण्यातील प्रसिद्ध चितळू बंधूंना ब्लॅमकेल करत २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी चितळेंकडे दुधात काळा रंग असल्याचा दावा करत खंडणी मागितली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका शिक्षिकेचा समावेश आहे.

ही कारवाई क्राइम ब्रांचने केली अटक करण्यात आलेल्यांची असून करण परदेशी, सुनील परदेशी, अक्षय कार्तिक, पूनम परदेशी अशी नावे आहेत. याशिवाय इतर दोघांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेली महिला एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षिका आहे. ही शिक्षिका चितळे बंधूंना ईमेल तसंच फोन करून दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याची तक्रार करत पाच लाखांची मागणी करायची. यावेळी त्यांना बदनामी करण्याची तसंच पैसे दिले नाहीत तर दुकान बंद करायला लावू अशी धमकीही दिली होती. सुरुवातीला त्यांनी केलेली पाच लाखांची मागणी नंतर २० लाखांपर्यंत पोहोचली होती.

या प्रकरणी चितळेंनी तक्रार केली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचून कारवाई करण्यात आली. आरोपींना देण्यासाठी पोलिसांनी चितळेंना २ लाख दिले होते ज्यामध्ये चलनात नसलेल्या २ हजारांच्या नोटा होत्या. जेव्हा आरोपींनी पैसे घेतले, तेव्हा पोलिसांनी रंगेहाथ त्यांना पकडलं. 

मुंबईतून आरोपींचा एक साथीदार कार्तिक याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील, करण आणि अक्षय यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सुनील आणि करण यांचा लाँड्रीचा व्यवसायदेखील आहे.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा