कामगार मंडळात 80 कोटींचा घोटाळा !

 Mumbai
कामगार मंडळात 80 कोटींचा घोटाळा !

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये 80 कोटी रूपयांचा बांधकाम घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पदाचा गैरवापर करून मंडळाचे  माजी कामगार राज्यमंत्री डॉ. हेंमत देशमुख आणि स्थापत्य अभियंता प्रकाश पाटील यांनी घोटाळा केल्याची तक्रार करण्यात आली आहे. सिटीझन्स जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सरचिटणीस रफिक मुलाणी यांनी ही माहिती उघड केली आहे. कामगार कल्याण मंडळास मिळणारा निधी  कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कला, क्रिडा, साहित्य तसंच शैक्षणिक प्रगतीसाठी वापरण्याची तरतूद आहे. मात्र  या निधीचा वापर करून  ठिकठिकाणी 19 इमारती बांधल्या जात आहेत. 

 

Loading Comments