बेस्ट वाहकांची सुरक्षा धोक्यात

 Dadar
बेस्ट वाहकांची सुरक्षा धोक्यात
बेस्ट वाहकांची सुरक्षा धोक्यात
बेस्ट वाहकांची सुरक्षा धोक्यात
See all

दादर - बेस्ट बस धावत असताना एका बाइकस्वारानं दादर पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर बेशिस्तपणे वाहन रस्त्याच्या मध्ये घुसवल्यानं अपघात झाला असता. मात्र बस चालकाच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला. असं असलं तरी त्या बाइकस्वारानं बसमध्ये घुसून बेस्टवाहन चालकाच्या डोक्यात रागाच्या भरात हेल्मेट घातल्याचा प्रकार केला. मात्र बस वाहकाने मध्यस्थी करून स्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे हाणामारी टळली.

याबाबत बेस्ट मुख्य जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांच्याशी चर्चा केली असता. शासकीय कर्मचाऱ्यांवर ऑन ड्युटी हल्ला किंवा मारहाण करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. एखाद्या वेळी अशी घटना घडली तर संबंधित बेस्ट वाहन चालकानं अथवा वाहकाने बेस्ट वायरलेसवर कळवल्यास मदत मिळणं शक्य होतं. पण अचानक होणाऱ्या घटनांवर नियंत्रण आणणे बऱ्याचदा कठीण होतं. त्यामुळे बेस्ट चालकांनी थेट बस नजीकच्या पोलीस ठाण्यात वळवून त्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करणे गरजेचं आहे.

Loading Comments