वाशी टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांची दादागिरी, कारमधील प्रवाशाला बेदम मारहाण

नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर कारमधील प्रवाशाला वाहतूक पोलिसाने बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.

वाशी टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांची दादागिरी, कारमधील प्रवाशाला बेदम मारहाण
SHARES

नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर कारमधील प्रवाशाला वाहतूक पोलिसाने बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये पोलीस संबंधित प्रवाशावर दादगिरी करत असल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर पोलिसांवर टीका केली जात आहे.

मंगळवारी रात्री ८ वाजताची घटना घडली आहे. कार चालकाचा गुन्हा असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार आहे. मात्र अनेकदा पोलीस यंत्रणा ही नागरिकांच्या सेवेसाठी असते त्यांना त्रास देण्यासाठी असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. बहुतांश जणांना पोलिसांबाबतचा अनुभव हा वाईट असतो.

भर रस्त्यात अशी मारहाण करण्याचा पोलीसांना कुणी अधिकार दिला? असा सवाल या घटनेमुळं उपस्थित केला जात आहे. दरम्यान या पोलिसावर काही कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा