नौदल कर्मचाऱ्याची जहाजावरच आत्महत्या


नौदल कर्मचाऱ्याची जहाजावरच आत्महत्या
SHARES

मुंबईत आएमएस बेतवा या युद्ध नौकेवर कार्यरत असलेल्या एका २२ वर्षीय जवानाने स्वतःला गोळी मारून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रमेश चौधरी असे या जवानाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केलेली आहे.

हेही वाचाः - सर्वांसाठी लोकल सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

मुळचा जोधपूरचा असलेला चौधरी मुंबईत आएनएस बेतवावर तैनात होता. आज (रविवारी) सकाळी त्याने आपल्या सर्व्हिस रायफलद्वारे स्वत:वर गोळी झाडून घेतली. चौधरीचा बेतवावर मृतदेह सापडला. त्यावेळी त्याच्या मृतदेहाशेजारी त्याची सर्व्हिस रायफ ल देखील होती. मुंबई पोलिस नौसेनेच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत रमेश चौधरी याच्या कुटुंबात आई-वडील आणि बहीण आहे. रमेश अविवाहीत आहे. नुकतीच सु्ट्टी संपवून तो परत आला होता. चौधरी याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आएनए बेतवा ही नौका मिसाईल फ्रिगेट श्रेणीची नौका आहे. बेतवा नदीच्या नावावरून या नौकेला हे नाव देण्यात आले आहे. भारतीय सैन्यदलात आत्महत्या करण्याची ही घटना काही नवी नाही. या पू्र्वी सैन्यदलात आत्महत्यांची प्रकरणे उघड झालेली आहेत. भारतीय नौदलात तुलनेने कमी आत्महत्या झाल्या आहेत. आयएनएसवर शिवालीकवर एका २४ वर्षीय जवानाने देखील स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या होत्या.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा