भंगारात विकलेला लॅपटॉप उलगडणार ‘विवा ग्रुप’चा गैरकारभाराचे रहस्य


भंगारात विकलेला लॅपटॉप उलगडणार ‘विवा ग्रुप’चा गैरकारभाराचे  रहस्य
SHARES

ईडीच्या पथकाने भाई ठाकूर कुटुंबियांच्या विवा गृप भोवती कारवाईचा फास आवळला आहे. या प्रकरणात ईडीने अटक केलेल्या विवा गृपचे सीए मदन चतुर्वेदीच्या चौकशीनंतर विविध ठिकाणी छापेमारी केली. त्या चौकशीत चतुर्वेदी यांनी हे रहस्य लपवण्यासाठी त्यांचा लॅपटाँप हा अवघ्या ३०० रुपयांना भंगारात विकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा भंगारातील लॅपटाँप शोधून काढण्याचे आवाहन आता ईडीपुढे आहे.

पीएमसी घोटाळ्यात सामील असल्यामुळे एचडीआयएल गृपवर ईडीने फास आवळला. त्याचे धागेदोरे विवा समुहापर्यंत पोहोचले आहेत. एचडीआयअलचे सर्वात मोठे ले-आऊट वसई विरारमध्ये असून त्यांच्यासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी एचडीआयअलने १९९१ पासून भाई ठाकूरची मदत घ्यायला सुरूवात केली. हे समीकरण इतके घट्ट होते की वरडाई चांदी प्रकरणी भाई ठाकूर तुरुंगात गेल्यानंतरही ते कायम राहीले, किंबहुना घट्ट झाले. मुंबईत मोठी कामे करणारे बडे बिल्डर वसई-विरारमध्ये ठाकूर कंपनीच्या दहशतीमुळे काढता पाय घेत असताना एचडीआयएलने मात्र इथे कामाचा धडाका लावला होता. दोन्ही कंपन्यांमध्ये गेल्या तीस वर्षात शेकडो कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याची शक्यता आहे. एचडीआयएलमुळे विवाचे वसई-विरारमधील साम्राज्य बळकट झाले. आज एचडीआयअलमुळे ठाकूर कंपनी गोत्यात आली आहे. ईडीच्या कारवाईत विवा समुह आणि एचडीआयअल यांचे गेल्या तीन दशकांतले व्यवहार उघड झाले आहेत. हा आकडा सुमारे चारशे कोटींचा आहे असे मानले जाते.

या प्रकऱणी अटकेत असलेल्या विवा गृपचे सीए मदन चतुर्वेदींनी त्यांचा लॅपटाँप हा ३०० रुपयात भंगारात विकल्याची कबूली दिली. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ईडीची टीम सध्या वसई विरारमध्ये अनेक भंगरवाल्यांची चौकशी करून या लॅपटॉपचा शोध घेत आहे. विवा गृपवर झालेल्या छापेमारीनंतर कंपनीचा सीए मदन चतुर्वेदी आणि व्यवस्थापकीय संचालक मेहुल ठाकूर यांनी झालीय अटक केली. अटक आरोपी मेहुल ठाकूर आणि मदन चतुर्वेदि यांनी त्यांचे मोबाईल पूर्णपणे फॉरमॅट केले असून या लॅपटॉपमध्ये बरीच महत्वाची माहिती आहे त्यामुळे ईडीकडून या लॅपटॉपचा शोध घेतला जातोय.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा