85 लाखांच्या नव्या नोटा जप्त

 Kings Circle
85 लाखांच्या नव्या नोटा जप्त
85 लाखांच्या नव्या नोटा जप्त
See all

माटुंगा - मुंबईच्या माटुंगा परिसरातून 85 लाखांची रोकड जप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 85 लाखांसोबत गुन्हे शाखेने चौघांना ताब्यात घेतले असून एक ईन्होवा गाडी देखील पकडली आहे. यातील 73 लाख 2000 च्या नोटांच्या स्वरूपात आहेत, तर बाकी 12 लाख 100 च्या स्वरुपात आहेत. सांगितल जातंय की, क्राईम ब्रांचला माटुंग्याच्या बी. ए. रोड वर काही जण पैशाचा व्यवहार करायला येत आहेत याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेनं सापळा रचला आणि ईन्होवा गाडीसह चौघांना ताब्यात घेतलं. "सध्या या सगळ्यांची चौकशी सूरू असून त्यानंतरच हा पैसा कोणाचा ते स्पष्ट होईल. 85 लाखांची ही कॅश नवीन नोटांच्या स्वरूपात असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन नोटा कशा उपलब्ध झाल्या असा प्रश्न विचारला जातोय.

Loading Comments