चाकूच्या धाकावर आरोपीने दुसऱ्यांदा पीडितेवर केले अत्याचार

त्याने चाकूच्या धाकावर पीडितेला सोबत येण्यास भाग पाडले. पीडितेला घेऊन पंकज त्याच्या आरसीएफ काँलनी येथील राहत्या घरी घेऊन आला.दुसर्

चाकूच्या धाकावर आरोपीने दुसऱ्यांदा पीडितेवर केले अत्याचार
SHARES
बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या 36 वर्षीय आरोपीने तक्रारदार पीडितेवर चाकूच्या धाकावर पून्हा बळजबरी केल्याचा प्रकार चेंबूर परिसरात पुढे आला आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी पंकज बाजीराव अहिरे याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.


मुंबईच्या चेंबूर येथील लालडोंगर परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय पीडित तरुणीचे 2012 मध्ये पंकजसोबत ओळख झाली होती. कालांतराने दोघांच्या मैञिचे रुपांतर प्रेमात झाले. त्यावेळी लग्नाचे आमीष दाखवून पंकजने पीडित तरुणीशी शारिरीक संबध ठेवले. माञ तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्यावर पंकजने तिला लग्नास नकार दिला. पंकजने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने त्याच्या विरोधात 2013 मध्ये चुन्नाभट्टी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि फसवणूकीचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी त्याला अटक केली. या गुन्ह्यात पंकज कित्येक वर्ष तुरूंगात शिक्षा भोगत होता.


तर दुसरीकडे तरुणी घडलेला प्रकार विसरून पून्हा तिच्या आयुष्यात रमली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकज हा शिक्षा भोगून बाहेर आला होता. त्यावेळी त्याने पीडित तरुणीचा माग काढत ती कामाला असलेल्या ठिकाणी पोहचला. कामावरून पीडित तरुणी घरी जात असताना मोबाइलवर मग्न असल्याचे पाहून पंकजने तिचा मोबाइल हिसकावला. त्यावेळी पंकजला पाहून पीडित तरुणी घाबरली. पंकजने पीडितेच्या मोबाइलवरून स्वत:ला मिसकाँल देत तिचा नंबर मिळवला.त्यानंतर पंकज वारंवार पीडितेची समजूत काढत लग्न करण्यासाठी पीडितेच्या मागे लागला. माञ पीडित तरुणीचा नकाराचा पाडा कायम होता. तरुणीच्या या स्वभावाला कंटाळून पंकजने 25 नोव्हेंबर रोजी पीडित तरुणी काम करत असलेल्या कुर्ला येथील पतपेढीजवळ तिला गाठले. त्यानंतर त्याने चाकूच्या धाकावर पीडितेला सोबत येण्यास भाग पाडले. पीडितेला घेऊन पंकज त्याच्या आरसीएफ काँलनी येथील राहत्या घरी घेऊन आला. त्यावेळी त्याने तरुणीवर पून्हा चाकु दाखवून अत्याचार करत तिला मारहाण केली. तसेच लग्नासाठी तयार न झाल्यास परिणाम वाईट होतील असे ही धमकावले.  वेळीच पंकज बाथरूममध्ये शौचास गेल्याची संधी साधून तरुणीने कशीबशी पंकजच्या तावडीतून सुटका करून घेत घर गाठले. घरी घडलेला प्रकार तिने घरातल्यांना सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी चेंबूर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पंकजला अटक केली आहे. दुसऱ्यांदा आरोपीकडून करण्यात आलेल्या अत्याचारामुळे पीडित तरुणी मानसिक तणावात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा