96 गुन्हे करणारा करण गजाआड

 Mumbai
96 गुन्हे करणारा करण गजाआड

मुंबई - मुंबई गुन्हे शाखेने पश्चिम आणि पूर्व उपनगरात चोऱ्या करणाऱ्या कुख्यात चोराला अटक केली आहे. करण रमणीकलाल शहा (36) असं या चोराचं नाव आहे. या सराईत गुन्हेगारावर तब्बल 96 केसेस नोंद असून दरोडा घालणं आणि नागरिकांची फसवणूक करण्यात हा तरबेज आहे. खार, वांद्रे, सांताक्रूझ, वाकोला, चेंबूर, कुर्ला, भांडुप आणि मुलुंड यांसारख्या अनेक पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत.

बुधवारी हा करण सांताक्रूझ परिसरात येणार असल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून सापळा रचून याला अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच या करणने वाकोला परिसरात एका तरुणाला लुबाडलं होतं. गुन्हे शाखेने याला अटक करून वाकोला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

Loading Comments