कांजूरमार्गमध्ये तरुणीवर अॅसिड हल्ला

या हल्यात मुलीचा हात आणि छातीवर गंभीररित्या दुखापत झाली.

कांजूरमार्गमध्ये तरुणीवर अॅसिड हल्ला
SHARES
कांजूरमार्गच्या पार्कसाईट परिसरात चार अनोळखी युवकांनी १५ वर्षीय तरुणीवर अॅसिड टाकल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. या हल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कांजूरमार्गच्या म्हाडा काॅलनी येथील आम्रपल्ली सोसायटीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहते. रविवारी सकाळी पीडित मुलगी ही सकाळी ६ च्या सुमारास बाजीप्रभू देशपांडे गेटच्या उद्यानासमोरून जात होती. त्यावेळी चार अनोळखी तरुणांनी तिची वाट अडवली. त्यावेळी तरुणीने चौघांना दाद न देता हटकले. याचा राग म्हणून त्या चौघांमधील एकाने मुलीवर बाटलीतून आणलेले अॅसिड फेकले.

या हल्यात मुलीचा हात आणि छातीवर गंभीररित्या दुखापत झाली. हल्लाकरून चार ही आरोपींनी पळ काढला. अॅसिड हल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी मुलीला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा