• अभिनेते मुकेश रावल यांचा मृतदेह रेल्वेरुळावर आढळला
SHARE

मुंबई - रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण या मालिकेत बिभीषणाची भूमिका साकारणाऱ्या मुकेश रावल यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला. ते 52 वर्षांचे होते. कांदिवली ते बोरिवली रेल्वे स्टेशनच्यामध्ये रेल्वेरुळाच्या बाजूला मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास रावल यांचा मृतदेह आढळला. रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनची धडक लागल्यानं जागीच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुकेश रावल हे बँकेतून पैसे काढण्यासाठी घाटकोपरकडे गेले होते, असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. कुटुंबियांना मुकेश रावल यांचा मृत्यू झाल्याची बातमी बुधवारी समजली.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या