अबब! मुंबईत 6000 किलोंचा पूलच चोरीला

मुंबई शहरातील एका पुलाच्या चोरीचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.

अबब! मुंबईत 6000 किलोंचा पूलच चोरीला
SHARES

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आश्चर्यकारक घटवा समोर येत आहे. सध्या मुंबई शहरातील एका पुलाच्या चोरीचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा पूल 6 हजार किलो वजनाचा आणि नव्वद फूट लांब आहे. हा लोखंडी पूल आहे.

याप्रकरणी सध्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. हा तात्पुरता लोखंडी पूल गेल्या वर्षी जून महिन्यात नाल्यावर टाकण्यात आला होता. ज्यातून अदानी इलेक्ट्रिसिटीची केबल जाणार होती. मात्र, यावर्षी एप्रिल महिन्यात कायमस्वरूपी पूल आल्याने तो काढण्यात आला.

दोन लाख रुपये खर्चाचा हा पूल क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आला. २६ जून रोजी अदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी या पुलाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना हा पूल गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात आढळून आले की, हा लोखंडी पूल जिथे ठेवण्यात आला होता तिथे सीसीटीव्ही बसवले नव्हते. मात्र, नंतर पोलिसांनी परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. ज्यामध्ये पोलिसांना समजले की काही लोकांनी गॅस कटरच्या साहाय्याने पूल हळूच कापला आणि नंतर तो काढून घेतला.

त्यांनी ही माहिती अदानी इलेक्ट्रिसिटीला दिली नाही. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक कंपनीचा कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्याला अदानी इलेक्ट्रिसिटीने पूल बांधण्याचे कंत्राट दिले होते. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, पोलिसांनी चोरीचा सर्व माल जप्त केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा