शक्ती मिल बलात्कार प्रकरण: दीपक साळवी विशेष सरकारी वकील

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात अॅड. दीपक साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी दिली.

शक्ती मिल बलात्कार प्रकरण: दीपक साळवी विशेष सरकारी वकील
SHARES

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात अॅड. दीपक साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी दिली. 

कायद्याच्या चौकटीत शिक्षा

शक्ती मिल बलात्कार प्रकरणी सुनावलेली फाशीची शिक्षा ही कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयानंतर आरोपींनी फाशीच्या शिक्षेविरोधात दिलेलं आव्हान आणि राज्य सरकारने फाशी कायम करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार या सुनावणीला आॅगस्टपासून नियमीत सुनावणी होणार आहे.  

फाशीची शिक्षा

मुंबईतील शक्ती मिल कंपाऊंड इथं २२ ऑगस्ट २०१३ साली विजय जाधव, मोहम्मद बंगाली, मोहम्मद अन्सारी आणि सिराज खान या आरोपींनी एका महिला छायाचित्रकारावर बलात्कार केला होता. या खटल्यात सत्र न्यायालयाने आरोपींना एप्रिल २०१४ साली फाशीची शिक्षा सुनावली. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर बलात्काराच्या कायद्यातील कलम ३७६ (ई) मध्ये सुधारणा करण्यात आली. या सुधारणेलाच तिघा आरोपींनी आव्हान दिलं होतं.  हेही वाचा-

मंत्रीपद धोक्यात? विखे-पाटील, क्षीरसागर, महातेकरांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

महाराष्ट्रात आढळले ३६ हजार ४३१ रेबीजचे रुग्णसंबंधित विषय