ANC ची मोठी कारवाई, पोस्ट ऑफिसातून ड्रग्ज केलं जप्त

१.०३ किलोग्रॅमचे मरिज्युआना मिळाला असून तो जप्त केला. तसेच ७४ ग्रॅमच्या या अंमली पदार्थाची जप्ती नवी मुंबईती नेरुळ येथील एका इमारतीमधून हस्तगत करण्यात आले.

ANC ची मोठी कारवाई, पोस्ट ऑफिसातून ड्रग्ज केलं जप्त
SHARES

अँन्टी नारकोटिक्स ब्युरो कंट्रोल म्हणजे एनसीबीच्या मुंबई विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील लोणावळा पोस्ट ऑफिसात ड्रग्ज असलेले पार्सल जप्त केले गेले. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आले आहे. श्रीमय परेश शहा आणि नवी मुंबईतून ओंकार जयप्रकाश तुपे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.  पोस्टात हे पार्सल कॅनडा देशातून आले असल्याचे निश्पन्न झाले आहे.

हेही वाचाः- एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट; अद्याप वेतन नाही

लोनावळा परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ANC च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीवर अधिक तपास केला असता. ड्रग्ज हे पोस्ट आँफिसच्या कुरिअरद्वारे पाठवण्यात आले असून ते स्विकारण्यासाठी दोन तस्कर येणार होते. त्यानुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. रविवारी हे पार्सल स्विकारण्यासाठी आलेल्या दोघांना ANC च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. हे पार्सल दोन दिवसांपूर्वी कॅनडा येथून पाठवण्यात आले ते उघडून पाहिले असता त्यांना १.०३ किलोग्रॅमचे मरिज्युआना मिळाला असून तो जप्त केला. तसेच ७४ ग्रॅमच्या या अंमली पदार्थाची जप्ती नवी मुंबईती नेरुळ येथील एका इमारतीमधून हस्तगत करण्यात आले. तपासानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत ५० ते ५५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे ड्रग्ज पुढे मुंबई आणि बेंगलोर परिसरात विक्रीसाठी पाठवले जाणार होते. 

हेही वाचाः- ई-संजीवनीचा ६ हजार रुग्णांनी घेतला लाभ

एनसीबीने या प्रकरणी अहमदाबाद येथील श्रीमय परेश शहा आणि नवी मुंबईतील ओंकार जयप्रकाश तुपे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास केला जात आहे. दरम्यान, यापूर्वी मुंबईतील धारावीत पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरकडून जवळजवळ १.२० किलोग्रॅमचे हिरॉइन जप्त केले होते. त्याची किंमत तब्बल २.४० कोटी रुपये होती. या प्रकरणाचा तपास घाटकोपर मधील ANC सेलला ड्रग्जच्या डिलिव्हरी बद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने धारावीतील ६० फीट येथून पेडलर याला अटक करण्यासाठी कट रचला. संयुक्त पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी असे म्हटले की, संबंधित पेडलर हा अन्य पेडलर्स किंवा ग्राहकांना ड्रग्ज विक्री करण्यासाठी पोहचला. पथकातील सदस्यांनी पॅडलर कडून १.२० किलोग्रॅम ड्रग्जचे पॅकेटसह रंगेहाथ पकडले. त्यामध्ये हिरॉइन मिळाले असून त्याची किंमत २.४० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा