Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट; अद्याप वेतन नाही

आर्थिक समस्या भेडसावत असतानाच दुसरीकडे एसटीत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट; अद्याप वेतन नाही
SHARES

कोरोनामुळं अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावं लागलं असून अनेकांची आर्थिक स्थिती (financial issues) बिकट झाली आहे. यामध्ये अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना (essential workers) वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचाही (msrtc) समावेश आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना अद्याप ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचं वेतन (salary) अद्यापही मिळालेलं नाही. त्यामुळे आर्थिक समस्या भेडसावत असतानाच दुसरीकडे एसटीत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या उपचारासाठी कर्मचाऱ्यांना पैशाची गरजही भासत आहे.

एसटीच्या आतापर्यंत ७२ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला असून मागील ५ दिवसांत ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन एसटीच्या एक लाखाहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाले नव्हतं. जुलै महिन्याच्या वेतनासाठी राज्य शासनाकडून निधी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ७ ऑक्टोबरला वेतन देण्यात आलं. पुढच्या वेतनासाठी राज्य शासनासोबत चर्चा करून लवकरच वेतन देण्याचं आश्वासन परिवहनमंत्री (transport minister) आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब (anil parab) यांनी आश्वासन दिले.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब कोरोनाची (corona) लागण झाल्यानं मागील आठवड्यातील सोमवारी रुग्णालयात दाखल झाले आणि शनिवारी ते घरी परतले. सध्या ते विलगीकरणात आहेत. तर एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने बिहारला निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून गेले आहेत. त्यामुळे दोघेही उपलब्ध नसल्याने आर्थिक चिंता लागून राहिलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन दिवाळीआधी होणार की नाही, याबाबत चिंता आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा