लाचखोर पोलिसाला अटक


लाचखोर पोलिसाला अटक
SHARES

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(एसीबी)ने पवई पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर यादवला ५००० लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. 

यासंदर्भात एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता. त्या प्रकरणी तक्रारदाराच्या नातेवाइकाने त्याच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात तक्रारदाला मदत करण्याच्या बदल्यात ५० हजार रुपयांची मागणी यादव यांनी केली होती. पण तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी अखेर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार, एसीबीने सापळा रचून ५ हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारताना यादव यांना रंगेहात पकडले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा