रिक्षा पेटली : 9 पोळले

शिवाजी नगर- गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास चालत्या रिक्षाने अचानक पेट घेतला. या रिक्षातून 3 महिला आणि 5 लहान मुले प्रवास करत होती. रिक्षात लागलेल्या आगीत 9 जण जखमी झाले आहेत. खातीजा कुरेशी (39), साजिद कुरेशी (30), फिरदोसा कुरेशी (20) आणि पाच मुलं, तसेच रिक्षा चालक शरीफ शेख (58) हे देखील यामध्ये जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ बाहेर काढत गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली आहे.

Loading Comments