सकाळी सकाळी मागितली दारू मिळाला मार


सकाळी सकाळी मागितली दारू मिळाला मार
SHARES

बारचा मॅनेजर आणि त्याच्या माणसांनी एका रिक्षाचालकाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना कांदीवली परिसरात शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास घडली. कांदीवली पश्चिम परिसरात असलेल्या संजोग देशी बारमध्ये ही घटना घडली. यामध्ये रिक्षाचलक चंद्रभान पाल याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

सकाळी 9 च्या सुमारास चंद्रभान पाल हा दारू पिण्यासाठी संजोग देशी बारमध्ये गेला. त्यावेळी मॅनेजरने त्याला सकाळी दारू देण्यास नकार देत त्याची मस्करी केली. यावेळी तो मॅनेजरला मस्करी करू नको म्हणून थांबवायला गेला असता बारमधील माणसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप रिक्षा चालकाने केला आहे.  या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा