संजय दत्त विरोधात जामीनपात्र अटक वॉरंट

 Mumbai
संजय दत्त विरोधात जामीनपात्र अटक वॉरंट
Mumbai  -  

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तविरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे. चेक बाऊन्स प्रकरणी आणि चित्रपट दिग्दर्शक शकील नुरानी यांना धमकी दिल्याचा आरोप संजय दत्तवर आहे.

2002 मध्ये दिग्दर्शक शकील नुरानी यांनी संजय दत्त विरोधात कोर्टात खटला दाखल केला होता. त्यावेळी शकील नुरानी 'जान की बाजी' या चित्रपटाचे काम पाहत होते. या चित्रपटात संजय दत्त लीड रोलमध्ये होता. या चित्रपटासाठी संजय दत्तला शकील नुरानींनी 50 लाख दिले होते. मात्र संजय दत्त दोनच दिवस शुटिंगसाठी आला. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत दोन करोड रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी नुरानी यांनी केली. 

या विरोधात नुरानी हायकोर्टात गेले. ही नुकसान भरपाई करून देण्याचे आदेश हायकोर्टाने संजय दत्तला दिले. त्यानुसार संजयने नुरानी यांना चेक दिला. पण तो चेक बाऊन्स झाला. चेक बाऊन्स झाल्यानं कोर्टानं दोन ते तीन वेळा संजय दत्तला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. पण संजय दत्त कोर्टात हजर राहिला नाही. त्यामुळे अखेर कोर्टाने त्याच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले.

Loading Comments