चेंबूरमध्ये बेस्ट बसची कारला धडक


चेंबूरमध्ये बेस्ट बसची कारला धडक
SHARES

चेंबूर - बेस्ट बसने एका कारला धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री चेंबूरच्या बसंत पार्क परिसरात घडली. कुर्ल्यातून 369 क्रमांकाची बस वाशी नाका म्हाडा वसाहत इथे जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. या अपघातामध्ये कोणी जखमी झाले नसले तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. संतापलेल्या कारचालकाने अर्धा तास बस रस्त्यामध्येच रोखून धरली. परिणामी रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं चित्र पहायला मिळालं. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा