बेस्ट बस चालकाला मारहाण


बेस्ट बस चालकाला मारहाण
SHARES

घाटकोपरच्या मजास आगारातील सीप्ज मार्गावर बेस्ट बस चालकाला अनोळखी दुचाकीस्वारांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. ज्ञानदेव शेळके असं जखमी बेस्ट बस चालकाचं नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आली आहे.


का केली मारहाण?

कुर्णे चौक ते सीप्झ स्थानकादरम्यान शेळके बेस्ट बस चालवत होते. दरम्यान सीप्झ स्थानकावर त्यांची बस येत असताना एका डाव्या वळणावर शेळके यांनी बस वळवली. मार्ग अरूंद असल्यामुळे मागून येणाऱ्या चार ते पास दुचाकीस्वारांना पुढे जाता आलं नाही. यावरूनच त्यांनी बेस्ट बस अडवत बसमध्ये घुसून शेळके यांना मारहाण केली. या मारहाणीत शेळके यांच्या कपाळाला गंभीर जखम होऊ रक्तस्त्राव होऊ लागला. त्यावेळी आरोपींना घटनास्थळाहून पळ काढला.


आरोपींविरोधात मारहाण

शेळके यांना उपचारासाठी तातडीने ट्रामा केअर रुग्णालयात नेले. शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा