घाटकोपरमध्ये दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

 Asalpha
घाटकोपरमध्ये दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
घाटकोपरमध्ये दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
घाटकोपरमध्ये दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
See all

असल्फा - घाटकोपरमधील असल्फा विभागात असलेल्या नारी सेवा सदन रस्त्यावर रविवारी सायंकाळी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्यावर आलेल्या गटाराच्या पाण्यामुळे दुचाकी स्लिप होऊन टेम्पोला धडक बसली. यात ओमकार किसन शिंदे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो याच विभागात असलेल्या पगारे चाळ, सुंदर बाग या ठिकाणी राहत होता. एका मित्राला भेटण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. याबाबत घाटकोपर पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे.

Loading Comments