दोन बोगस डॉक्टरांना अटक


दोन बोगस डॉक्टरांना अटक
SHARES

मुबंई - भुलेश्वर आणि काळबादेवी भागात दोन बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. प्रशांत शीतल पोरे (46) आणि प्रशांत जुगल सामंत (55) अशी या दोघांची नावं आहेत. तर प्रदिप पांडे हा आरोपी फरार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून दोघं हा व्यवसाय करत होते. सी विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा