भाजपच्या नेत्यावर मीरा रोडमध्ये बलात्काराचा आरोप

मीरा रोड भागातील एका भाजप नेत्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

भाजपच्या नेत्यावर मीरा रोडमध्ये बलात्काराचा आरोप
SHARES

मीरा रोड भागातील एका भाजप नेत्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. नवीन सिंग असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. 25 वर्षीयं महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कारासह बळजबरी गर्भपात करून धमकावल्याचा गुन्हा दाखल दाखल केला आहे.

फिर्यादीनुसार, २०२१ साली तिची ओळख फेसबुक वरून मिरारोडमधील नवीन सिंग सोबत झाली. सिंग याने तिला महिना २० हजार पगार, रहायला फ्लॅट आणि मुलीची जबाबदारी घेतो असे सांगितले. त्यानंतर महिला मीरा रोडला रहायला गेली. त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध सुरू झाले. नगरसेवकाच्या निवडणुकीनंतर लग्न करू असे आश्वासन त्यानी दिले.

याशिवाय महिला गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार तर दिलाच पण तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे शोषण सुरू ठेवले.

आरोपीने महिलेचे फोटो आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाठवले, त्यानंतर पीडितेने बुधवारी काशिमीरा पोलिसात तक्रार दाखल केली.

आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम ३७६, ३१३, ५०४ आणि ५०६ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा-२००८ च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



हेही वाचा

सिद्धू मूसवाला मर्डर केस : आरोपींनी मुंबईतील सलमान खानच्या घराची केली रेकी

रात्रीच्या जेवणासाठी बिर्याणी न बनवल्याने पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा