Coronavirus cases in Maharashtra: 826Mumbai: 469Pune: 82Pimpri Chinchwad: 39Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Navi Mumbai: 22Ahmednagar: 22Nagpur: 17Thane: 16Panvel: 11Vasai-Virar: 8Latur: 8Aurangabad: 7Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 4Usmanabad: 4Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Gondia: 1Palghar: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 45Total Discharged: 56BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

शत्रुघ्न सिन्हा यांच्या घराबाहेर गोळीबार


शत्रुघ्न सिन्हा यांच्या घराबाहेर गोळीबार
SHARE

भाजपा खासदार अाणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबईतील निवासस्थानी एका पोलिस काॅन्स्टेबलकडून अचानक गोळी झाडली गेल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.


चुकून गोळी सुटली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शत्रुघ्न सिन्हा जुहू येथील ‘रामायण’ इमारतीत ८ मजल्यावर राहतात. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेसाठी असलेला पोलिस काॅन्स्टेबल अापली बंदूक तपासत होता. यावेळी चुकून बंदुकीचा ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली. चुकून गोळी झाडली गेली असली तरी या प्रकरणाचे तपास करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. 

यावेळी शत्रुघ्न सिन्हा घरी नव्हते.  ७२ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा हे बिहारमधील पटना साहिब मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. सध्या मोदी सरकारच्या धोरणांवर ते यशवंत सिन्हांच्या साथीने सातत्याने टीका करत अाहेत. त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबरही त्यांचा संपर्क वाढला अाहे. हेही वाचा -

कार, दुकाने फोडणाऱ्या टोळीला जेरबंद

एएनसीकडून ९ नायझेरियन तस्करांना अटकसंबंधित विषय
संबंधित बातम्या