रविवार ठरला अपघात वार

 Pali Hill
रविवार ठरला अपघात वार
रविवार ठरला अपघात वार
रविवार ठरला अपघात वार
See all

मुंबई - मुंबईच्या आसपास मोठे अपघात झालेत. सकाळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर नादुरुस्त टेम्पोला ट्रेलरनं मागून धडक दिली. यात वाहन चालक ठार झालाय. चंदू इंगळे असं मृत चालकाचं नाव आहे. चंदू अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचा रहिवासी आहे. अपघातानंतर ट्रेलर चालक फरार झाला.

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर तलासरी जवळ टॅंकरचा अपघात होऊन भीषण आग लागली. हा टॅंकर केमिकलचा होता. यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी आहेत. याआगीत एक कंटेनर, दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा जळाली. या अपघातात इनोव्हा कारमधील रसिका पाटील, प्राची पाटील, अजिंक्य पाटील जखमी झालेत. ही तिघं दादरमधली राहणारे आहेत. त्यांच्यावर पालघर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading Comments