तरुणीला अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत

इंस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या तरुणाला अटक करण्यात खेरवाडी पोलिसांना यश आलं आहे. आरोपीचं नाव कैलाश घायल असं आहे. अनेक दिवसांपासून कैलाश या तरुणीला अश्लील मेसेजेस पाठवून त्रास देत होता. मात्र बदनामीच्या भीतीने तरुणीने याबाबत कुणाला काही सांगितलं नव्हतं. अखेर तरुणीच्या आईने हे मेसेज पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

तरुणीला अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत
SHARES

इंस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या तरुणाला अटक करण्यात खेरवाडी पोलिसांना यश आलं आहे. आरोपीचं नाव कैलाश घायल असं आहे. अनेक दिवसांपासून कैलाश या तरुणीला अश्लील मेसेजेस पाठवून त्रास देत होता. मात्र बदनामीच्या भीतीने तरुणीने याबाबत कुणाला काही सांगितलं नव्हतं. अखेर तरुणीच्या आईने हे मेसेज पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी हनी ट्रॅप लावून कैलाशला अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार

वांद्रेच्या खेरवाडी परिसरात राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तरुणीकडे मोबाईल नसल्याने ती सोशल मिडियावर आपल्या मित्र मैत्रिणीशी बोलण्याकरता आपल्या आईचा फोन वापरत होती. मागील काही दिवसांपासून पुण्यात राहणारा कैलाश तरुणीला इंस्टाग्रामवर फॉलो करत होता. या दरम्यान त्याने तरुणीशी बोलण्यास सुरुवात केली. 


व्यावसायिक असल्याची बतावणी

स्वतःला पुण्यातील व्यावसायिक असल्याचं सांगत तो तरुणीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वस्तूस्थिती अशी की कैलास त्या व्यावसायिकाच्या कार्यालयात हेल्पर म्हणून कामाला होता. काही दिवसाच्या ओळखीनंतर कैलाशने तरुणीला प्रपोज केलं. त्याला तरुणीने नकार दिला. त्यानंतर कैलाश इंस्टाग्रामवर तरुणीला अश्लील मेसेज पाठवू लागला. तरुणीने मात्र त्याच्या कोणत्याही मेसेजला उत्तर दिलं नाही. तरीही कैलाश तीला त्रास देतच होता.


अखेर आरोपीला अटक

एेके दिवशी आईकडे फोन असताना कैलाशने तरुणीला अश्लील व्हिडिओ पाठवला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरुणीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकरली. कैलाशबाबत तिने तरुणीकडे विचारणा केल्यानंतर तरुणीने त्रास देणाऱ्या कैलाशची माहिती आईला दिली. याप्रकरणी तरुणीच्या आईने खेरवाडी पोलिस ठाण्यात कैलाशविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कैलाशला पकडण्यासाठी तरुणीला त्याच्या मेसेजला प्रत्युत्तर देण्यास सांगितलं. पोलिसांनी अखेर त्याला मुंबईत दादरच्या स्वामी नारायण मंदिराजवळ भेटायला बोलवून आपल्या त्याला अटक केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा