SHARE

ट्रॉम्बे - टँकरचालकाला चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या मन्सूर शेख या आरोपीला ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातल्या तीन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन अटक केली. या पोलिसांचा पोलीस उपायुक्त शहाजी उपम यांनी सत्कार केला. बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना सायन-पनवेल मार्गावर घडली होती. टँकर चालकाला आरोपी लुटत असताना ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे ब्रम्हदेव कचरे, सवीता कदम आणि कल्पना शिंदे हे कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी दोन्ही आरोपींचा पाठलाग सुरू केला. मात्र अंधाराचा फायदा घेत एका आरोपीने पळ काढला तर एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या